‘पांढऱ्या’ सोन्याचे भाव यंदा आभाळाला भिडणार, कापसाची साठवणूक ठरणार फायदेशीर



 


‘पांढऱ्या’ सोन्याचे भाव यंदा आभाळाला भिडणार, कापसाची साठवणूक ठरणार फायदेशीर


आपल्या शेतात अनेक वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतो त्यामध्ये ज्वारी बाजरी गहू मका कांदा कापूस या प्रकारची पिके असतात. कापूस हे एक नगदी प्रकारचे खरीप  पीक  आहे.कापूस  हा खरीप हंगामातील पीक आहे. यंदाच्या साली पावसामुळे खरीप पिकांचे खूप नुकसान झाले आहे त्यामुळे 50 टक्के पिके ही पाण्याखाली गेली किंवा खराब झालेली आहेत.त्यामुळे शेतकरी वर्गाला चांगलाच फटका मिळाला आहे. परंतु पावसाच्या नासाडीमुळे पिके खराब होऊन उत्पन्न कमी झाले परंतु पिकांचे भाव यामुळे भरघोस वाढायला लागले आहेत.

चालू हंगामात बाजारात कापसाला 6900-7000 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव:   सोयाबीनचे सुद्धा तसेच घडले उत्पन्न घटल्याल्यानंतर सोयाबीन चे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याचबरोबर पांढरे सोने म्हणजेच कापसाचे सुद्धा भाव  वाढत  आहेत. महाराष्ट्र  राज्यात एकूण पंचाऐंशी 85 लाख गाठी कापसाचे धोरण होते परंतु पावसाच्या नासाडीमुळे हे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटलेले आहे. डायरेक्ट 85 लाख  गाठी वरून  कापसाचे  उत्पन्न  75  लाखांवर आलेले आहे.त्यामुळे आपल्याला कापसाच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे. चालू हंगामात बाजारात कापसाला 6900-7000 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत आहे. परंतु हमी भाव हा 6025 रुपये एवढा दिला जात आहे.

 केंद्रावर येऊन कापूस घातला तर कापसाची खरेदी ही 10 लाख गठिपर्यंत केली जाऊ शकते.यंदाच्या वर्षी पावसामुळे कापसाचे (cotton)उपन्न मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे कापसाचे भाव वाढत आहेत. तसेच या वेळी कापसाला हमी भावापेक्षा जास्त दर मिळत आहे.कापसाची साठवण करून ठेवल्यास सुद्धा मोठा फायदा शेतकऱ्याला होणार आहे. त्यामुळे कापसाची साठवणूक करणे फायदेशीर ठरुन त्यातून जास्त मोबदला मिळू शकतो.

Comments

Popular posts from this blog

शेळीपालनासाठी करताय; मग जाणून घ्या! शेळीच्या विक्रीसाठी असलेले भारतातील महत्त्वाचे बाजार