मोठी बातमी; ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी मिळणार अनुदान, शेतकऱ्यांनो लवकर अर्ज करून घ्या “या” योजनेचा लाभ..


 


मोठी बातमी; ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी मिळणार अनुदान, शेतकऱ्यांनो लवकर अर्ज करून घ्या “या” योजनेचा लाभ..


कृषी विभागाकडून (Department of Agriculture) एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी (Dragon fruit planting) 40 टक्के अनुदान देण्यात येत आहे. हे अनुदान 2021-22 या वर्षापासून दिले जाते. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे.

ड्रॅगन फ्रूटला सुपर फ्रूट म्हणून प्रसिद्धी –

ड्रॅगन फ्रूट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्त्वे आणि ऍन्टी ऑक्‍सिडन्टमुळे (Nutrients and antioxidants) या फळाससुपर फ्रूट म्हणूनही प्रसिद्धी मिळत आहे. या फळात विविध औषधी गुण, फॉस्फरस, कॅल्शियम अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकून राहतात. या फळाला रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी असून, पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही.

एवढे मिळते अनुदान –

ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी (Dragon fruit planting) लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण यासाठी अनुदान देय आहे. प्रती हेक्‍टर चार लाख रुपये प्रकल्प मूल्य ग्राह्य धरून 40 टक्‍क्‍यांप्रमाणे एक लाख 60 हजार रुपये प्रति हेक्‍टर अनुदान तीन वर्षात 60 : 20 : 20 या प्रमाणात देण्यात येते. दुसऱ्या वर्षी 75 टक्के व तिसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य राहील, ही माहिती जिल्हा कृषी अध्यक्षकांनी दिलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

शेळीपालनासाठी करताय; मग जाणून घ्या! शेळीच्या विक्रीसाठी असलेले भारतातील महत्त्वाचे बाजार

‘पांढऱ्या’ सोन्याचे भाव यंदा आभाळाला भिडणार, कापसाची साठवणूक ठरणार फायदेशीर